Title of the document FREE SHIPPING within India on orders above 1299!! Please expect your parcel in 6 to 10 working days!!                         For international orders, please connect with us on 9321637525                         FREE GIFT on orders above 1999₹

समर कॅम्प

Make It Memorable

समर कॅम्प कर्जत

शहरी वातावरणात राहिल्यामुळे लहान मुले गाव संस्कृती, निसर्ग, मैदानी खेळ, आणि मुख्यतः शरीराला जीवनसत्वे देणारी फळे तसेच भाज्या ह्यांचे महत्व विसरत जात आहेत.

ह्या गावात झाडे झुडपे, कौलारू घरे, देऊळ, रेल्वे स्टेशन, रस्ते, वाहणारा झरा, बांबूची लागवड, आयुर्वेदिक झाडांची लागवड, शेततळे त्यातील मासे, देशी गायीचा गोठा, सरपंच घर, डाक घर, बालवाडी, अनेक प्रकारची भाजी, फळे, फुलांची लागवड हे सर्व मुलांना पाहता येईल.

शेतकरी मचाण, झोपाळे, लक्ष्मण झुला, जत्रेतील खेळ मुलांना अनुभवता येईल.

गावातील लघुउद्योग लोहारकाम, कुंभार काम, किराणा दुकान, दोरीची खाट बनवणे, मूर्तीकाम, सोनारकाम, चित्रकार ह्या सर्व उद्योगांची दुकाने वसलेली आहेत. मुले हे सर्व स्वतः अनुभवणार आहेत. कृत्रिम फॉल मध्ये भिजण्याची मजा आहेच.

छब्रा गाडीमधून गावात फेरफटका.

सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी चहा नाश्ता करून मुंबई प्रस्थान

Make It Memorable

समर कॅम्प वाई

शहरी वातावरणात राहिल्यामुळे लहान मुले गाव संस्कृती, निसर्ग, मैदानी खेळ, व्यायाम, पारंपरिक उत्सव आणि मुख्यतः शरीराला जीवनसत्वे देणारी फळे तसेच भाज्या ह्यांचे महत्व विसरत जात आहेत. हे सर्व एकाच जागी त्यांना शिकायला मिळणार आहे. समर कॅम्पच्या माध्यमातून दोन रात्र तीन दिवसात त्यांना बरेच काही शिकावयास मिळणार आहे.

आमचा वाई येथील रिसोर्ट हा सह्याद्री पर्वत वैराट गडाच्या पायथ्याशी आहे की जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा झरा त्यासोबत त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी झाडांची गर्दी, निसर्ग म्हणजेच झाडे, आणि निरनिराळ्या प्रकारची शेती पाहण्याची संधी मिळणार आहे. देशी केळीची बाग आणि इतर फळ बागायती लागवड पाहता येईल. मोरासारखे पक्षी आणि गीर जातीच्या गाई, गोठा तसेच इतर पाळीव प्राण्यांसोबत फोटो काढता येतील. बैलगाडी मध्ये बसून फिरण्याची मजा आहेच. स्वतःचे गाव अनुभवता येईल. पोहण्याचा तलाव, Adventure Tower, आणि ह्या प्रवासात शेतात पिकेलेली भाजी आणि गावरान पद्धतीच्या जेवणावर त्यांना ताव मारायचा आहे.

पहिल्या दिवशी सकाळी रिसॉर्ट मधील शेतीची माहिती मुलांना देऊन, रोजच्या जेवणातील भाज्या आणि फळे ह्यातून मिळणारे महत्व त्यांना सांगणार आहोत. संध्याकाळी लुप्त होत चाललेले आपले मैदानी खेळ खेळून, रात्री आपले सण उत्सव त्याचे महत्त्व तसेच बालगीतांचा कार्यक्रम असेल.


दुसऱ्या दिवशी सकाळी वाईचा गणपती, ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा स्थलदर्शन, नंतर रिसोर्ट मध्ये संध्याकाळ पर्यंत नियमित जीवनात उपयोगी येणारे व्यायाम, योग तसेच मुलांचे कलागुण वाढवणारे खेळ, रात्री धम्माल गेम्स आणि स्पर्धा आणि कॅम्प फायर..


तिसऱ्या दिवशी Mapro factory Visit आणि रिसोर्ट मध्ये जेवून मुंबई कडे प्रस्थान.

Call Us

9579240836
9833992699

Email

tttpravin@gmail.com

Location

F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.

    Scroll to Top